देश सोडण्यासाठी मला 50 कोटीची ऑफर होती – करूणा शर्मा

0
70

बीड जिल्हा परिषद च्या सर्व जागा लढवणार — शर्मा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आजच्या अधिवेशनामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडा जंगी पाहावयास मिळाली. यानंतर आज संध्याकाळी करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की मला देश सोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर होती असा दाव शर्मा यांनी केला. तसेच यावेळी त्या म्हणाल्या की बीड जिल्हा परिषद मधील ६० जागा आम्ही लढवणार असून त्यात आम्हाला यश येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला

बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ यांच्या बद्दल केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला दया, करुणा दाखवली होती. परंतु परत परत ती करुणा दाखवता येणार नसल्याचेही सुद्धा मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अधिवेशनानंतर आज रात्री आठच्या दरम्यान करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीनंतर करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की मला देश सोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर देण्यात आली होती. तसेच येणाऱ्या बीड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मध्ये आम्ही एकूण 60 जागा लढवणार असून त्या सर्व जागांवर आम्ही विजय मिळवणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.यासह त्या म्हणाल्या की मला शिंदे सरकार न्याय मिळून देईल असे मत सुद्धा व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here