मुख्यमंञी यांच्या प्रमुख उपस्थित लवकर शेतकरी मेळावा -माजी मंत्री सुरेश नवले

0
51

बीडच्या विकासाठी माजी मंत्री सुरेश नवले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. यामुळे येथील नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. 05) माजी मंत्री सुरेश नवले यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर पॉझिटिव्ह चर्चा झाली. लवकरच मुख्यमंत्री यांच्या उपस्थित बीड मध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेश नवले यांनी दिली.

माजी मंत्री सुरेश नवले यांनी शुक्रवारी (ता. 05) मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी आ.अब्दुल सत्तार, आ.शंभुराजे देसाई, आ. भरत गोगावले, माजी मंत्री अर्जून खोतकर, प्रकाश अबिटकर, पंडीत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांना विविध प्रश्‍नांचा सामना करावा लागत, ग्रामिण भागात चांगले रस्ते नाहीत, अनेक भागात लाईटची सोय नाही, बेरोजगारीचे प्रमाण बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. यासह इतर महत्वाच्या प्रश्‍नांच्या अनुषंगाने माजी मंत्री सुरेश नवले यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. बीड जिल्ह्यात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेश नवले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here