तीन आमदार 21 कोटीत फुटले – अमोल मिटकरी

0
32

मुंबई प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार 21 कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रत्येक आमदाराला 7 कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर 20 लाख रुपये येतील. मात्र, इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार सुरु आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली आहे. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना आणि वर दोन खोकी देऊत, अशी ऑफर देण्यात आल्याचेही मिटकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here