एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

0
69

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजपा नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here