Nagpur Assembly: दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी वंचितचे भीमपुत्र विनय भांगे यांची उमेदवारी दाखल

0
29

Nagpur Assembly:- दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा (Nagpur Assembly) मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भीमपुत्र विनय भांगे यांनी हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन समर्थक, वंचित बहुजन आघाडीचे शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जोशपूर्ण उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

आरक्षण आणि वंचित बहुजनांच्या उद्धाराचा संकल्प

भीमपुत्र विनय भांगे यांच्या रॅलीत संविधान चौक येथून हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन मतदार आणि समर्थकांनी मोठ्या जल्लोषात सहभाग घेतला. सर्व वंचित बहुजन व धमरनिरपेक्ष मतदार व समर्थकांचे धन्यवाद व्यक्त करीत भीमपुत्र भांगे यांनी त्यांना मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, आरक्षण वाचविण्यासाठी आणि वंचित बहुजनांच्या उद्धारासाठी सातत्याने संघर्ष करण्याचे वचन दिले. “आपण लढू, आपण जिंकू”, “वंचित बहुजनांचा एल्गार, आता भीमपुत्रच आमदार” अशा प्रचंड घोषणांच्या गजरात अखिल वंचित बहुजन व धर्मनिरपेक्ष मतदार व समर्थकांनी आजच्या रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला आणि भीमपुत्र भांगे यांच्या भक्कम पाठिंबा दर्शवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here