Chandrapur: यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा

0
32

Chandrapur :- यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे (Competition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १० पारितोषिके ठेवण्यात आली असून सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी सजावटीचा ६० सेकंदाचा व्हिडीओ तयार करून जैन भवनजवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

विविध आकर्षक स्पर्धा

राज्यासह चंद्रपूरातही गणेश उत्सवाची धूम आहे. सार्वजनिक आणि घरगुती गणपती विराजमान झाले आहेत. दरम्यान, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पर्यावरण सजावट, महाकाली महोत्सव थीमवर देखावा, चंद्रपूरचे वैभव दाखविणारे देखावे आदी विषयांवर सजावट करणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत १०,००० रुपये प्रथम, ९,००० रुपये द्वितीय, ८,००० रुपये तृतीय, ७,००० रुपये चतुर्थ, ६,००० रुपये पाचवे, ५,००० रुपये सहावे, ४,००० रुपये सातवे, ३,००० रुपये आठवे यासह इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here