Chandrapur :- हेश नवमी निमित्त शहरातून निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या (Chanda brigade)वतीने शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शीतपेयाचे वाटप
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे रशिद हुसेन, विश्वजित शहा, चंद्रशेखर देशमुख, राम जंगम, सायली येरणे, वंदना हजारे, कालिदास धामनगे, कैलास धायगुने, कार्तिक बोरेवार, महेश गहुकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरात महेश नवमी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली. लक्ष्मी नारायण मंदिर येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक (Gandhi square) येथे स्वागत मंच उभारला होता. ही शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहोचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शीतपेयाचे वाटप केले. सदर शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.