नागपूर (Nagpur) : राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba) यांनी आज पत्रकारांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत, असं आम्हालाही वाटतं. ते गृहीत धरून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, काल भाजपच्या ट्विटर वर मी पुन्हा येईल हा व्हिडिओ आला होता. पण तो आता डिलिट झाला म्हणून त्यावर बोलण योग्य नाही. पण अजित पवार मुख्यमंत्री होतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही कामाला देखील लागलो आहोत.
मी विदर्भात, अजित पावर राज्यात फिरून जास्तीत जास्त जागा निवडून आणणार आहे. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरल नाही. पण महायुतीमध्ये असल्याने त्यावर आता जास्त बोलणार नाही, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार सोमवारी यवतमाळमध्ये (Yavatmal) येत आहेत. पक्षाला कार्यक्रम देण्यात येणार आहे. अजित पावर विदर्भात दौरा करणार आहेत. तिन्ही पक्षाचे नेते बसून मुख्यमंत्री कोण, हे ठरवतील. अजित पवारांचा प्रशासनावर दबाव आहे, लोकांना देखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असंच वाटतं. तीन सहकारी असल्यानं तिन्ही पक्षांना वाटत आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असेही त्यांनी बोलून दाखविले.