आमच्या 50 लोकांमुळे हे सरकार आलेले !

सरकार डेंजर झोन मध्ये येते, तेव्हा वाचविणारे आम्हीच !

0
62
किशोर जोरगेवार
किशोर जोरगेवार

मुंबई :आमच्या 50 लोकांमुळे हे सरकार आलेले आहे. मात्र आता तुमचं लक्ष आमच्याकडे कमी होत आहे. तुमच पूर्ण लक्ष उजवीकडे आहे. सरकार डेंजर झोन मध्ये येते, तेव्हा वाचविणारे आम्हीच आहोत ना’,असे म्हणत चंद्रपूरचे (chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांनी सरकारमध्ये अपक्षांची गरज अधोरेखीत केली.

पावसाळी अधिवेशनाच्या ( rainy season) तिस-या दिवशी ‘पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन’वर चर्चा सुरु होती. यावेळी चंद्रपूर शहरात मंगळवारी (ता. १८) झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार उभे झाले. यावेळी सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरगेवार यांना मध्येच थांबवत ‘माहिती काय आहे’ असे बोलत ‘पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन’ मांडायला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here