शिवसेनेचे खरे जिल्हा प्रमुख कोण?

0
40

शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून सचिन मुळूक यांची निवड

जिल्ह्यात शिवसेनेचे तीन जिल्हा प्रमुख झाले?

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शिवसेनेतुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाकडून आता राज्यातभरात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात सुरुवात केली आहे. बीड जिल्हा प्रमुख म्हणून सचिन मुळूक यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र सचिन मुळूक यांना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी दिले. सचिन मुळूक यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणायचे का? शिंदे गटाचे हा प्रश्‍न आता शिवसैनिकांना पडला आहे. परंतु शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून सचिन मुळूक यांनी यापुर्वी सुद्धा काम केलेले आहे. यामुळे त्यांना जिल्ह्यात काम करताना पुर्वीचा अनुभव कामी येणार आहे. परंतु सध्या शिवसेनेचे तीन जिल्हा प्रमुख बीड जिल्ह्याला मिळाले आहेत. नेमके कोणते जिल्हा प्रमुख शिवसेनेचे हे मात्र कोर्टाचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

शिंदे गट बाहेर पडल्यामुळे आघाडी सरकार कोसळले व राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. नेमकी शिवसेना कोणाची हा वादा आता कोर्टात असल्यामुळे ज्या वेळेस कोर्टाचा निर्णय येईल त्यावेळेस समजेल की शिवसेना ठाकरेंची का शिंदे गटाची. परंतू सध्या तर शिवसैनिकांना विविध प्रश्‍न भेडसावत आहे. बीड जिल्हात सध्या तीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. यात एक म्हणजे अनिल जगताप व दुसरे अप्पासाहेब जाधव हे जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीस दोन्हीही जिल्हा प्रमुख हजर होते. त्यात काल शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी सचिन मुळूक यांनी निवड करण्यात आली आहे. निवडीच्या पत्रावर सचिन मुळूक यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केल्याचा उल्लेख असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना विविध प्रश्‍न भेडसावत आहेत. कोर्टाचा निकाल आल्यानंतर सर्वच बाबी स्पष्ट होणार आहेत. परंतु अजून थोडा त्यासाठी वेळ वाट पाहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here