देवाचा आशीर्वाद आहे पण लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केले नाही तर पोरं कसं होणार — मंञी नितीन गडकरी

0
35

अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari ) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात असंच एक वक्तव्य त्यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात केले आहे. शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन आणि विक्री याबाबत मार्गदर्शन करताना नितीन गडकरींनी एक विचित्र उदाहरण दिले. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही तर पोरं कसं होणार असं नितीन गडकरी म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच अशा पिकला. मात्र, या उदाहरणाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादन आणि विक्री याबाबत मार्गदर्शन केले

अमरावती मध्ये ‘अपेडा’ व ॲग्रोव्हिजन फौंडेशनतर्फे एका मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर या शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादन व त्याची विक्री यावर मार्गदर्शन केले. याच दरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले तुम्ही शेतमालाच चांगलं उत्पादन केलं चांगलं पॅकींग केलं तर तुम्ही पिकवलेली संत्री देखील विदेशात जाईल. नाही तर मग अस व्हायला नको देवाचा आर्शिवाद आहे आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरग कस होणार असं नितीन गडकरी म्हणाले. त्यांचे हे व्यक्तव्य ऐकून सभागृहात हशा पिकला. यामुळे शेतमालाला मार्केच मिळावे यासाठी तुम्हालाही काही इनिशीटीव्ह घ्यावं लागेल असा सल्ला नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here