मुख्यमंञी ठाकरे यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार

0
32

प्रारंभ न्युज

मुंबई : शिवसेनेचे नेते व मंञी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अडचणीत आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबाबत मलबार हिल पोलीस ठाण्यात भाजपने तक्रार दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात आले. फेसबूक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधतानाही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच वर्षा निवास्थान सोडल्याने हजारो शिवसैनिकांनी वर्षावर गर्दी केली. या सर्वांना मुख्यमंत्री भेटले, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी करत ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here