राज्याचे नवे गृहमंञी दिलीप वळसे पाटील!

0
757

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे  गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.

राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही (Dilip Walse Patil) यांचेही नाव चर्चेत होते. 

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here