गणेशोत्सव धुमधडाक्यात! गणेश मूर्तीसाठी उंचीची मर्यादा नाही!

0
42

 

मुंबई प्रतिनिधी : करोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून सण तसेच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. मात्र या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवीली जाणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

“मंडप तसेच इतर परवानग्या लवकर मिळाव्यात म्हणून एक खिडकी योजना तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्यात याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोठेही क्लिष्ट अटी नकोत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गणेश मंडळांकडून नोंदणी शुल्क घेण्यात येऊ नये, हमीपत्रदेखील घेऊ नका, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे. हा उत्सव साजरा करताना नियमांचा बागुलबुवा नको, असेदेखील अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुंबईतील नियमावली राज्यभर लागू असेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here