शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीसाठी दिला होता ग्रीन सिग्नल- राहुल शेवाळे

0
41

 

नवी दिल्ली: एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना युतीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर प्रयत्न करा असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

राहुल शेवाळे म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर योग्य ते निर्णय घ्या. जून 2021 मध्ये उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा झाली. मात्र त्यानंतर जुलैच्या अधिवेशनात 12 आमदारांचं निलंबन केलं, त्यातून चुकीचा संदेश गेला, एकीकडे उद्धव युतीचं बोलणं करतायत दुसरीकडे निलंबन करतायत यामुळे भाजप पक्ष श्रेष्ठी नाराज झाले आणि पुढची चर्चा रखडली. आता तुम्ही युतीसाठी प्रयत्न करा असं उद्धव ठाकरेंनी खासदारांना सांगितल्याचे, शेवाळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here