पत्रकारांचे प्रश्न विधिमंडळात लावून धरणार!

0
35
व्हॉईस ऑफ मीडिया,नागपूर.
व्हॉईस ऑफ मीडिया,नागपूर.

विविध मतदारसंघातील आमदारांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपोषण मंडपाला भेट देत दिले आश्वासन

नागपूर (Nagpur), ता. १४ : जो दुसऱ्यांचे प्रश्न मांडतो त्या पत्रकारांच्या प्रश्नाला वाचा फुटायलाच हवी. आम्ही तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आणि विधिमंडळात पत्रकारांचा आवाज बुलंद करू, असे आश्वासन विविध मतदारसंघातील आमदारांनी दिले

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाने (Voice Of Media) हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Adhiveshan) नागपुरात पुकारलेल्या लाक्षणिक उपोषण मंडपाला आज गुरुवारी विविध मतदारसंघातील आमदारांनी भेटी दिल्यात. गडचिरोली – चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते (Ashok Nete), बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad), आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे(krushna Gajbe), नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक (Shirishkumar Naik), विधानपरिषदेचे आमदार रामदास आंबटकर (Ramdas Ambatkar) आदी आमदारांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली. या सर्व लोकप्रतिनिधींना व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे (Sandeep Kale), प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के (Anil Maske) व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक दाद देत पत्रकारांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी दिली. केंद्र सरकारकडे सुद्धा हे प्रश्न मांडण्याचे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. कवी लोकनाथ यशवंत यांनीही उपोषण मंडपाला भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला.

व्हॉईस ऑफ मीडिया, नागपूर.
व्हॉईस ऑफ मीडिया, नागपूर.
पटोले, वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यांनीही दिला विश्वास

व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे (Sandeep Kale) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विधिमंडळातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा केली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), आमदार बच्चू कडू(Bacchu Kadu), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी निवेदन स्वीकारत पत्रकारांच्या मागण्या लावून धरण्याचे आश्वासन दिले.

उत्साह आणि घोषणा

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांचा उत्साह दांडगा होता. पत्रकारांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी आज सर्व पत्रकारांनी घोषणा दिल्या. या घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here