राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

0
41
नागपूर.
नागपूर.

नागपूर (Nagpur), दि. २/१२/२०२३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी दोन दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने शनिवारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे (New Delhi) प्रस्थान केले.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

नागपूर.
नागपूर.

राष्ट्रपती शुक्रवारी रात्री नागपूर राजभवन येथे मुक्कामी होत्या. शनिवारी सकाळी सुरेश भट सभागृहामध्ये विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आटोपल्यानंतर राष्ट्रपती महोदया नागपूर विमानतळावर पोहोचल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), एअर मार्शल विवेक गर्क (Air Marshal Vivek Garg), ब्रिगेडिअर राहुल दत्त (Brigadier Rahul Dutt), विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari),पोलीस आयुक्त अमितेश कुमार(Shri Amitesh Kumar (I.P.S.)), जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर (Dr. Vipin Itankar IAS) ,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार (Harsh Poddar) आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here