आनंद आंबेकर
बारामती (Baramati) : राज्यात एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आजारपणाचा राजकीय अर्थ काढला जात आहे. बारामतीत पत्रकारांच्या अधिवेशनालाही आजारपणाचे कारण दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले. मात्र दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्घाटन सत्रात श्रोता म्हणून तर विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार (Wadettiwar) यांनी उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर वडेट्टीवार हे स्वतः समोर बसलेल्या शरद पवार यांना भेटायला गेले आणि त्यानंतर ते शरद पवारांच्या गाडीत गेले. त्यावर आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, बारामतीच्या या पत्रकार अधिवेशनात आलेल्या पत्रकारांचे आदरातिथ्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार (Sunetra tai Pawar) यांनी केला. उद्घाटन कार्यक्रमात त्या स्वतः मंचावर होत्या. मुख्य म्हणजे, अजित पवार यांचा संदेशवजा भाषण त्यांनी वाचून दाखविले. या भाषणात त्यांनी आजरपणाचा दाखला देत उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार हेमंत पवार (Hemant Pawar) उपस्थित होते.