राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात.

0
43
Former MP Raju Shetti
Former MP Raju Shetti

22 दिवस 522 किलोमीटर शेट्टींसह शेतकरी चालणार.

कोल्हापूर (Kolhapur): गतसाली तुटलेल्या ऊसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल व्हावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी(Former MP Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पद यात्रेला सुरुवात झाली. जागोजागी फुलांचा वर्षाव करत राजू शेट्टी यांच्या पदयात्रेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.

मंगळवार 17 ऑक्टोबरपासून सुरू झालेली पदयात्रा गुरूदत्त, जवाहर (Jawahar), घोरपडे(Ghorpade), शाहू(Shahu), वारणा(Varna), क्रांती(kranti), वसंतदादा(Vasantdada), राजारामबापू(Rajaram Bapu) यासह एकूण 37 साखर कारखान्यांवर ही पदयात्रा धडकणार आहे. स्वाभिमानीच्या वतीने पदयात्रा मार्गावरील साखर कारखाना प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. जोपर्यंत दुसऱ्या हप्त्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याचे धुराडे देणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

जिल्ह्यासह राज्यातील गळीत हंगाम सुरू होण्याला विलंब होत असल्याने आंदोलनाबाबत स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ चर्चा करणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ आर पी शेतकऱ्यांना अदा केली आहे. मात्र दुसरा हप्ता 400 रुपये देण्यासंदर्भात साखर कारखान्यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही या विरोधात आता माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. ही लढाई शेतकऱ्यांना चारशे रुपये मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.
7 नोव्हेंबरला होणार पद यात्रेची सांगता होणार आहे. आज पासून सुरू झालेली आक्रोश पदयात्रा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना धडक या जयसिंगपूर येथे 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत होणार आहे. चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याबाबत कोणता निर्णय होतो यानंतरच माजी खासदार राजू शेट्टी ऊस परिषदेत पुढील भूमिका मांडणार आहेत.
——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here