मुंबई : राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीपासून वेगळा गट स्थापन केला. 2 जुलै रोजी त्यांनी नऊ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 12 दिवसांनी खाते वाटप करण्यात आले. त्यातही अजित पवार विजयी झाले. त्याच्या गटाला हवी असलेली सर्व खाती मिळाली. शिवसेनेकडे (Shivesena) सध्या मुख्यमंत्रीपद आहे. मात्र मलाईदार खाती राष्ट्रवादीकडे आहे. भाजप (BJP) दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कसा झाला अजितदादांना फायदा?
राज्यातील सत्ताकारणात अजित पवारांचा फायदा झाला. त्यासाठी दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना पटवण्यात ते यशस्वी झाले. मिळालेल्या खात्यांवरून अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांचे महत्त्व स्पष्ट होत आहे. खातेवाटपापूर्वी अजित पवार यांनी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली होती. एवढंच नाही तर त्याच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना अपेक्षित खाती मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले.
अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले. त्यानंतर गुरुवारी अमित शाह यांचा संदेश घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले. एकनाथ शिंदे यांना ठाण्यात जाऊन भेटले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की, शिंदे यांच्यासोबत त्यांचे भावनिक नाते आहे, परंतु अजित पवार यांच्याबरोबर कुटनीती आहे.