बेताल वक्तव्य करणार्‍या खा.अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे बीड मध्ये दहन

0
42

सावंत यांच्यासह ठाकरे गटाने चुकीचे भाष्य करु नये- कुंडलिक खांडे

बीड प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल उध्दव ठाकरे गटाचे खा.अरविंद सावंत यांनी अत्यंत चुकीचे आणि कोणालाही न पटणारे वक्तव्य केले असून त्यामुळे हजारो शिवसैनिकांच्या भावनांना त्यांनी हात घातला आहे. ज्या प्रमाणे त्यांनी हे वक्तव्य केले आहे त्या बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करत असून यापुढे त्या गटाने असे वक्तव्य करण्याचे धाडस करु नये अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल असा सज्जड इशारा बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला आहे. ठाकरे गटाचे खा.अरविंद सावत यांच्या वक्तव्याचा आज बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करुन खा.सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
आज महाराष्ट्र राज्याचे  लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय  एकनाथजी शिंदे यांच्या बद्दल खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल आज बीड जिल्हा शिवसेनेच्या दाधिकार्‍यांसमवेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नगर रोड बीड येथे तीव्र निदर्शने करून, प्रतिमात्मक पुतळा जाळण्यात आला. अरविंद सावंत यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांची तात्काळ माफी मागावी, अन्यथा येत्या काळात त्यांना बीड जिल्ह्यामध्ये पायही ठेवू देणार नाही असा इशारा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला आहे.या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान आणि लोक कल्याणकारी कार्यामुळे ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी आमच्या नेत्याबद्दल चुकीचे आणि अवमानकारक वक्तव्य केलेले आहे. जनता ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी असून ठाकरे गटाकडून होणार्‍या अशा वक्तव्यामुळे लाखो शिवसैनिकांच्या भावनांना ठेच पोहचली आहे. खा.अरविंद सावंत यांनी तात्काळ माफी न मागितल्यास त्यांना यापुढे बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही आणि शिवसैनिक जशास तसे उत्तर देण्यास सक्षम असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला.
प्रसंगी उपस्थित   जिल्हाप्रमुख कुंडलिक बापू खांडे,शिवसेना नेते सुधीर काकडे तालुकाप्रमुख संतोष घुमरे, गणेश बाप्पा उगले, शहर प्रमुख कल्याण कवचट, गोवर्धन काशीद, देवराव घोडके, विभाग प्रमुख रंजीत कदम, राजेभाऊ नवले, राजू लोंढे, नानासाहेब घल्लाळ, बापूसाहेब माने, उपशहर प्रमुख नासेर भाई, माजी सरपंच सखाराम मोहिते, रामप्रभू घोडके, हनुमान जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब जाधव, पप्पू शिंदे, राहुल साळुंखे, प्रदीप शिंदे,राजेश शिंदे,विकी जाधव यांच्या सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here