छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक रवाना होणार -जिल्हाप्रमुख अनिल जगताप

0
40

बीड प्रतिनिधी :  आज छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या महाविकास आघाडीच्या विराट सभेला बीड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक रवाना होणार आहेत. जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या विराट सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. बीड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक सभेला जाण्यासाठी उत्सुक आहेत. संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याचा आवाज छत्रपती संभाजीनगरमध्ये घुमणार आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here