कामाची वेळ संपून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सह्या सुरुच!

0
42

31 मार्च असल्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी तळ ठोकून

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपत असल्यामुळे आर्थिक वर्षाचा निधी त्या त्या वर्षात संपवण्यासाठी सर्वच ऑफिसमध्ये अधिकारी हे उपलब्ध असतात. सध्या बीड जिल्हा परिषद मध्ये सहा वाजून गेले तरीही प्रलंबित असलेले काम मार्गी लावण्यासाठी संबंधित ठेकेदार व अधिकारी जिल्हा परिषद मध्ये तळ ठोकून आहेत. इतर वेळ वेळेचे कारण देणारे अधिकारी आज वेळ संपला तरी आप आपल्या ठिकाणी हजर आहेत. वेळ होऊन सुद्धा फाईलवर सह्या करताना दिसून येत आहेत.

एक एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते. याच वर्षांमध्ये शासनाची जी कामे असतील ती कामे मार्गी लावण्यासाठी सर्वच जण धडपड करत असतात. आज 31 मार्च असल्यामुळे चालू वर्षातील निधी खर्च करण्यासाठी आता ठेकेदार व अधिकारी जोमाने काम करत असल्याचे चित्र जिल्हा परिषद मध्ये निर्माण झाला आहे. सध्या जिल्हा परिषद परिसरामध्ये अधिकार्यांची कामकाजाची वेळ संपली तरी सुद्धा जिल्हा परिषद ची पार्किंग वाहनाने गच्च भरलेली आहै. सर्वच अधिकारी वेळ संपल्यानंतर सुद्धा आपापल्या ठिकाणी तळ ठोकून असल्याचे चिञ सध्या जिल्हा परिषद मध्यै आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here