Beed : परळी शहरात मोठ्या जुगार अड्यावर छापा!

0
41

१७ लाखाचा मुद्देमाल जप्त; २९ जणांना घेतले ताब्यात

प्रारंभ वृत्तसेवा

परळी : शहरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांना मिळाली होती. यानंतर स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी व त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता 29 जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या 29 जनावर गुन्हा नोंद करत 17 लाख 93 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. या कारवाईने परळी शहरातील अवेद्य धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली. सध्या सुरू असलेल्या पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांना चाप बसत आहे.

परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका ठिकाणी जुगार अड्डा चालत असून त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची गुप्त माहिती सहाय्यद पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांना मिळाले होते यानंतर धीरज कुमार यांनी परळी शहरातील हमालवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारला असता त्या ठिकाणी 29 जण जुगार खेळत असताना दिसून आले या 29 जणांवर गुणांन करत 17 लाख 93 हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमात जप्त करण्यात आला. परळी शहर पोलीस स्टेशन येथील सपोनि अविनाश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी नामे बाळासाहेब महादेव बळवंत,( वय ४२ वर्ष रा. हमालवाडी ता. परळी), ज्ञानोबा ऊर्फ बापु अनंतराव नागरगोजे (वय ६३ वर्ष रा. शिवाजीनगर परळी), दिलीप रामराव गडम (लातुरकर), (वय ६० वर्ष रा. विश्वराज सिटी लातुर ता.जि.लातुर), विठठल गणपतराव भुसेवाड (वय ६६ वर्ष रा. उत्तर त्रिमुर्ती नगर परभणी ता.जि.परभणी), नासेर शेरखान पठाण (वय ५५ वर्ष रा. मलीकपुरा परळी ता. परळी), सय्यद अमिर सय्यद जाफर वय ४४ वर्ष रा. पोठ मोहल्ला परळी ता. परळी), बाळु सर्जेराव अल्हाट वय २८ वर्ष रा. मोगरा ता. माजलगाव जि.बीड), नामदेव तुकाराम कराड (वय ५३ वर्ष रा. इंजेगाव ता. परळी जि.बीड), देवराव लक्ष्मण शिंदे (वय ५० वर्ष रा. लोणी ता. परळी जि. बीड), पांडुरंग राघोबा काळे (वय ३८ वर्ष रा. सिरसाळा ता. परळी जि. बीड) , चेतन त्रिंबक महाजन (वय २० वर्ष रा. महाजन गल्ली सोनपेठ ता. सोनपेठ जि. परभणी), व्यंकटी युवराज राजळे ( वय ३५ वर्ष रा. बोर्डा ता. गंगाखेड जि.परभणी १३) रतन रघुराम हजारे, वय ४७ वर्ष रा. डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी), सुभाष गोपीनाथ जाधव (वय ४० वर्ष रा. डिघोळ ता. सोनपेठ जि.परभणी ), बापुराव रामभाऊ वगरे (वय ३८ वर्ष रा. शिंदेवाडी ता. माजलगाव जि.बीड), बळीराम हरीभाऊ चव्हाण (वय ४३ वर्ष रा. डिघोळ ता. सोनपेठ जि.परभणी), शेख बशीर शेख फरीद ( वय ५८ वर्ष रा. बियाणी महामंडळ संजय गांधीनगर परभणी ता. जि. परभणी), अनिल गंगाधर कंदे, वय ३७ वर्ष रा. कोपरा ता. अहमदपुर जि. लातूर), शाम रामभाऊ माने (वय ४९ वर्ष रा. हमालवाडी परळी ता. परळी जि. बीड) वैजिनाथ विश्वंभर सुर्यवंशी (वय ४५ वर्ष रा. कोपरा ता. अहमदपुर जि.लातुर) बालाजी सखाराम जाधव (वय ४३ वर्ष रा. वडर कॉलणी परळी ता. परळी जि. बीड), मुसाखाँन शेरखान पठाण (वय ३९ वर्ष रा. कोमटवाडी ता. जि. परभणी), मासुम हमीद पठाण (वय ४० वर्ष रा. पोखर्णी ता. जि. परभणी ), खलील अजेशखॉन पठाण (वय ३४ वर्ष रा. पोखर्णी ता. जि. परभणी), रविंद्र सुदार कदम वय २६ वर्ष रा. फकीर जवळा ता.धारुर जि.बीड ता. जि. परभणी), भारत किसन गायकवाड (वय ५० वर्ष रा. संगम ता. परळी जि. बीड), केशव विश्वंभर बळवंत, (वय ७३ वर्ष मुळ रा. हमालवाडी), रमेश केशव वाघ (वय ५९ वर्ष रा. रा. पोखर्णी ता. जि. परभणी), अशोक चंद्रभान बडे ( वय ३२ वर्ष रा. खाडेवाडी ता.माजलगाव) यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि श्री. गोसावी पोलीस स्टेशन परळी शहर हे करत आहेत. हि कारवाई सहायक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक नेहरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक धीरज कुमार यांनी व त्यांच्या टिम मधील सपोनि श्री. अविनाश राठोड पोना, अशोक नामदास, गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, श्री कानतोडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here