Beed : पिंपळनेर – बाभळवाडी रस्त्यासाठी ६ कोटी मंजूर

0
30

प्रशासकीय मान्यता मिळाली: परमेश्वर सातपुते यांच्या पाठपुराव्याला यश

बीड: पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील
पिंपळनेर – बाभळवाडी रस्त्यासाठी ६ कोटी ३२ लाख १७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्ता कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या आराखड्यात या रस्त्याचा समावेश करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत होती. २०२० मध्ये आराखड्यात समावेश झाला व प्रत्यक्षात सर्वेक्षण करून घेतले. पण प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. अखेर १३ जानेवारीला ती मिळली असून निधीही मंजूर झाला आहे. आता तांत्रिक मान्यता मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. लवकरच रस्ता कामाला सुरुवात होणार आहे. रस्ता दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे परमेश्वर सातपुते यांनी सांगितले.
…..

परिसरातील ग्रामस्थांची टळणार गैरसोय
पिंपळनेर सर्कल मधील अत्यंत महत्त्वाचा असणारा हा रस्ता आहे. पिंपळनेर येथील लोकांना डाक बंगल्याकडून वळसा घालून यावे लागायचे. आता रस्ता कामामुळे तीन किलोमीटर अंतर कमी होणार आहे. नवीन रस्त्यामुळे थेट पिंपळनेर आशापुरक गणपती मंदिर देवस्थान ते बाभळवाडी फाटा ,पेट्रोल पंपा समोरून बीड रोडला जाणे सोपे होईल. त्यामुळे बीड पिंपळनेर जाण्यासाठी सोयीचा मार्ग होत असल्याने पिंपळनेर, बाभळवाडीसह गुंदा, आडगाव परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय टळणार आहे.

……
पाच वर्षांपासून पाठपुरावा
या रस्त्यासाठी किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी पाच वर्षांपासून पाठपुरावा केला. आराखड्यात समावेश झाल्यावर दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. या रस्त्यासाठी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर साहेब यांच्याकडेही परमेश्वर सातपुते यांनी पाठपुरावा केला. लोकसभा निवडणुकीवेळी परमेश्वर सातपुते व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी तत्कालीन ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्याकडे रस्त्याचा प्रश्न मांडला होता. माजी मंत्री बदामराव पंडित व शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांच्या मार्फत तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनाही निवेदन दिले होते.या सर्व पाठपुराव्याला यश आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे…तर आताच्या शिंदे फडणवीस सरकारने मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानले…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here