एकाच व्यक्तीचे दोन मतदार कार्ड असल्यास एक रद्द होणार

0
54

      बीड : निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम नियमितपणे सुरू असतो. त्यात मतदारांच्या नोंदणीसह यादीतील दुरुस्तीचा समावेश असतो. या दरम्यान एकाच मतदारांची नावे ही वेगवेगळ्या मतदारसंघात असल्याचेही दिसून येते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील चेहऱ्यामध्ये साम्य असलेल्या 61 हजार 270 मतदारांचे बाबतीत कार्यवाही करून त्यातील मतदारांचे नाव एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

मतदारांची संख्या – मतदारांच्या चेहऱ्यामध्ये साम्य असलेल्या मतदारांची संख्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये पुढीलप्रमाणे आहे. गेवराई 8818, माजलगाव 10461, बीड 12819, आष्टी  8157, केज  11135, परळी 9880

एकाच व्यक्तीचे दोन कार्ड, एक रद्द होणार – एकाच व्यक्तीचे दोन कार्डे असल्याने यादीतील चेहऱ्यात साम्य दिसत आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीशी संबंधीत BLO मार्फत संपर्क साधून त्यांचे एक मतदान कार्ड रद्द करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व बीएलओ त्यांचे स्तरावर मतदारांना संपर्क करण्याबाबत निवडणूक विभागातर्फे सुचित करण्यात आलेले आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी (अ.का.) संतोष राऊत यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here