श्वांनाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “भाई का बड्डे आंदोलन “विशेष चर्चेत

0
28

अखेर बीड शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज प्रकरणात मुख्याधिकारी यांचा कारवाईचा ईशारा :आंदोलनाची दखल :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज प्रकरणात ७ महिन्यापासून ३ वेळा निवेदन आणि २ वेळा आंदोलनानंतर मुख्याधिकारी नगरपरिषद बीड उमेश ढाकणे यांनी अनाधिकृत होर्डिग्ज धारकांवर कारवाई करण्याचा ईशारा देत बॅनर लावल्यास थेट कारवाई करण्यात येईल असे जाहीर प्रकटन जारी करण्यात आले आहे.

बीड शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक तसेच मुख्य चौक,बाजारपेठ,मुख्य रस्त्यावर ठिक-ठिकाणी जाहीरातपर बॅनर,नेत्याच्या;कार्यकर्त्याच्या वाढदिवस तसेच पदाधिकारी निवड आदि व ईतर व्यावसायिक जाहीराती मुळे वाहतुकीची कोंडी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले होते. याविषयी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली “भाई का बड्डे ” तसेच धरणे आंदोलन करण्यात आली होती.

दि.१६ मे रोजी बीड शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस च-हाटकर,रामनाथ खोड, मुबीन शेख,सय्यद आबेद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्वानांचा वाढदिवस साजरा केला होता. या अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.

जिल्हाधिकारी यांचे नगरपरिषद प्रशासनाला दोन वेळा लेखी आदेश

सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर दि.३० मे २०२२ आणि दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी दोन वेळा जिल्हाधिकारी बीड यांनी नगरपरिषद प्रशासनाला व सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना लेखी आदेशाद्वारे नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here