आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा बुस्टर डोस; लोखंडीसाठी ७९ पदांना मंजूरी

0
30

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती

बीड प्रतिनिधी : आरोग्य मंत्री तानाजी सावंत शेवटच्या
घटकाची जाण असलेले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य
व्यवस्थेबाबत त्यांनी कायम काय हवे ते मागा परंतु गरिबांना
चांगली रुग्णसेवा द्या असे सांगीतलेले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या
अंतर्गत येणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील रिक्त
पदांबाबत त्यांच्याकडे अहवाल पाठविताच आरोग्य मंत्री तानाजी
सावंत यांनी ७९ पदे मंजूर करुन बीड जिल्ह्याच्या आरोग्य
यंत्रणेच्या सुधारणेसाठी बुस्टर डोस दिल्याची माहिती, जिल्हा
शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शुक्रवारी (दि. १६)
दिली.
गुरुवारी (दि. १५) शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने
काल्पनिक कुशल ६८ आणि काल्पनिक अकुशल ११ अशा ७९
पदांना मान्यता दिल्याचे आदेश निघाले आहेत.
डॉ. सुरेश साबळे म्हणाले, बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयातनंतर
सर्वात मोठे रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे उभारण्यात आले. स्त्री
रुग्णालय व परिचर्या प्रशिक्षण केंद्र व मानसिक आजार व वृद्धत्व
उपचार केंद्र असे भव्य दोन रुग्णालयांची उभारणी झाली. मात्र, १३
वर्षे दोन्ही भव्य रुग्णालये कार्यान्वित नव्हते. कोविडच्या काळात
या दोन्ही ठिकाणी जंबो कोविड रुग्णालय चालविण्यात आले. या
ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोविडवरील उपचार झाले. हजारो
कोविड रुग्णांना लोखंडीच्या स्त्री रुग्णालय व वृद्धत्व उपचार व
मानसिक आजार केंद्रात चालविलेल्या जंबो कोविड सेंटच्या
माध्यमातून मिळाल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले.
मागील वर्षभरापासून दोन्ही ठिकाणी सिझेरिअन, डिलेव्हरी, इतर
शस्त्रक्रीया व नेत्रशस्त्रक्रीया मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत.
गोरगरिब रुग्णांची जाण फोटो : बीआयडी१३डीडीपी०८ :
मात्र, या ठिकाणी ७९ पदे रिक्त होते. त्यामुळे गरिब रुग्णांना उपचारासाठी अडचणी येत होत्या. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर व नंतर मुंबईला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत हा मुद्दा लक्षात आणून देताच श्री. सावंत यांनी लोखंडीच्या वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रातील रिक्त असलेले ७९ पदे भरण्यास मंजूरी देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी काल्पनिक कुशल ६८ व काल्पनिक अकुशल ११ अशा ७९ पदांना मंजूरी मिळाल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. या पदांसाठी दरवर्षी एक कोटी ८१ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले. मंजूर पदांमध्ये अधिपरिचारिका, आहार तज्ज्ञ, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, नेत्रशल्यचिकीत्सक, नेत्रशल्यचिकीत्सा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष, युनानी, होमिओपॅथीक), योगा व नॅचरोपॅथीस्ट, लिपीक, शिपाई, रक्तपेीढी परिचर, कक्षसेवक आदी पदांचा समावेश असल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा केज, धारुर, अंबाजोगाईसह परिसरातील कळंब तालुक्यातील रुग्णांना देखील होणार असल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here