पिंपळनेर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमी पडणार नाही – डॉ.योगेश क्षीरसागर

0
29

बीड  प्रतिनिधी :  काल बीड तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या पिंपळनेर बचाव ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. पुष्पाताई सुधीर नरवडे यांच्या सदस्यांच्या प्रचारार्थ आयोजित फेरी व बैठकीस युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पिंपळनेर बचाव ग्राम विकास आघाडी रिंगणात आहे. काल युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर प्रमुख उपस्थितीत सरपंच पदाच्या उमेदवार सौ.पुष्पाताई संजय नरवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढून बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी डॉ.योगेश भैया क्षीरसागर म्हणाले की, पिंपळनेर हे मोठ्या संख्येचे गाव आहे. या गावाची ओळख जागृत गणपती देवस्थान म्हणून ओळख आहे.मात्र ही ओळख कुठे तरी कमी होत आहे.कारण मागील पाच वर्षात या गावात कसल्याही प्रकारची विकासकामे झाली नाहीत.मागच्या विधानसभेच्या वेळी निवडून आलेल्या लोकांनी मागच्या पाच वर्षात पिंपळनेर गावाची वाट लावली. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास होत आहे. पिंपळनेरगाव वाचण्यासाठी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बचाव पॅनलची उभारणी केली आहे.
मात्र आता भूलथापांना बळी पडू नका.
गावचा विकास करण्यासाठी पिंपळनेर बचाव ग्राम विकास आघाडीला निवडून द्या. गावातील अंतर्गत रस्ते नाल्या आणि पाण्याचा प्रश्न येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच सोडवला जाईल.
गावचा विकास करण्यासाठी कमी पडणार नाही. ज्याप्रमाणे बीड शहरात दर्जेदार कामे सुरू आहेत त्याचप्रमाणे पिंपळनेर मध्ये देखील कामे करू. पिंपळनेरचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. गावकऱ्यांना सोबत घेऊन विकास करायचा आहे त्यामुळे पिंपळनेर बचाव ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ पुष्पाताई संजय नरवडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन पिंपळनेर ग्रामपंचायत ताब्यात द्या असे आवाहन केले.माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून आपण आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणू शकतो म्हणून कार्यकर्त्यांनी कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर आपण निवडून येण्यासाठी ही निवडणूक लढवावी व आपला सरपंच होईल या पद्धतीने काम करावे असे आवाहन डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नरसिंह नाईकवाडे, विनोद मुळुक, शुभम धूत, चरखा, चंदू आप्पा, संजय नरवडे यांच्यासह गावातील नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here