सिरसाळ्यात ॲड. शेख शफिक भाऊंचा झंझावात आता डोअर टू डोअर

0
31

सिरसाळा  प्रतिनिधी – ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊंचा झंझावात सिरसाळ्यात चौफेर सुरू आहे. सभांच्या माध्यमातून प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर शफीक़ भाऊंनी संपूर्ण सिरसाळ्यात डोअर टू डोअर भेटीगाठी घेतल्याने तळागाळातील जनतेचे सर्वसामान्यांचे नेते म्हणून शिक्का मोर्तब झाले आहे. जेव्हा मुख्य नायक स्वतः मतदारांना भेटायला पायाला भिंगरी लावून प्रत्येकाच्या गाठीभेटी घेतो तेव्हा त्याच्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे मत मतदार व्यक्त करीत आहे. यामुळे सिरसाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एआयएमआयएम पक्षाने लोक कल्याण पॅनल कडून उभे केलेले सरपंच आणि अन्य उमेदवार नक्कीच बाजी मारून विजयश्री मिळवतील हे दिसून येते.
सिरसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत शफीक भाऊ स्वतः जातीने निवडणुकीची धुरा सांभाळत असून त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष शरीफ भाई, जमील अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष युसुफ भाई, अश्फाक सेठ, परळी तालुकाध्यक्ष शेख शरीफ , ज्येष्ठ नेते जमील अध्यक्ष, कार्याध्यक्ष फेरोज खान (जनाब), अतीक भाई, अन्वर भाई, वडवणी तालुकाध्यक्ष अकबर पठाण, युवा नेते खादर कुरेशी, मुस्तफा भाई, मा. ताज खान, युवा नेते मोहसीन भाई, तोहिद भाई, नुर कुरेशी, अतिक शेख, जिल्हा समन्वयक सय्यद सैफअली (लालु भैय्या) असा लवाजमा आहे.

एआयएमआयएम च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा – शफिक भाऊ

सिरसाळा ग्रामपंचायत साठी एआयएमआयएम ने सरपंच पदासह अन्य उमेदवार उभे केलेले आहेत. या सर्वांना सिरसाळातील मतदारांनी भरघोस मते देऊन निवडून द्यावे. पक्ष जनसेवेसाठी सदैव तत्पर आहे. सिरसाळा गावाचा विकास आणि जनहिताचे कार्य करण्याची संधी एआयएमआयएम च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावी असे आवाहन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी करतो आहे असे शफीक भाऊ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here