प्रवाशाची बसचालक-वाहकाला दमदाटी, बसचा काच फोडला

0
34

नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल

बीड । प्रतिनिधी : केज-मांजरसुंबा दरम्यान प्रवास करणार्‍या एका प्रवाशाने बस वाहक-चालकास तिकिट काढत नाही या कारणावरून दमदाटी करत बसच्या मागील बाजूस दगड मारून काच फोडली. चालकाच्या फिर्यादीवरून प्रवाशावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिलवंत वामन राऊत, वय 32 हे सरकारी बस घेवून जात असताना केजवरून राजू जनार्धन मुंडे हे प्रवासी बसमध्ये बसले त्यांनी केज ते मांजरसुंबा दरम्यानचे तिकिट काढले परंतु मांजरसुंबा आल्यानंतर ते बसमधून न उतरता पुढील प्रवास करत राहिले, या दरम्यान वाहकाने त्यांना पुढील तिकिट काढण्यास विनंती केली असता त्यांनी पुढील तिकिट न काढला वाद घालण्यास सुरुवात केली, यानंतर त्यांनी बसच्या खाली उतरून बसचा मागील काच फोडला. याप्रकरणी चालक यांच्या फिर्यादीवरून प्रवाशी राजू मुंडे यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 186, 427 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here