घरबांधकामासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0
29

सतत शिवीगाळ करत महिलेला मारहाण, जिवे मारण्याची धमकी
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल

बीड । प्रतिनिधी : महिलेच्या सुरक्षेसाठी देशामध्ये अनेक सुरक्षा कायदे केले असताना सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने महिलांचा छळ होतच आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणत नसल्यामुळे रोजच शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारित्र्यावर संशय घेणे यासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चार जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या एका महिलेला सासरची मंडळी सतत मानसिक छळ करत होते, चारित्र्यावर संशय घेवून रोजच शिवीगाळ करण्यात येत होती, यासह माहेरहून घर बांधण्यासाठी दहा लाख रुपयांची रक्कम घेवून ये यासाठीसुद्धा तगादा लावत असे. सदरील महिलेने माहेरहून दहा लाख रुपये न आणल्यामुळे चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुनिल सर्जेराव खंडागळे, वय 44, सर्जेराव खिराजी खंडागळे 70, कांताबाई सर्जेराव खंडागळे वय 65, संगिता रविंद्र गवळी 48 यांच्याविरुद्ध कलम 498 अ, 323, 504, 506, 34 भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here