पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी; उपमुख्यमंत्री फडणवीसांना राजेंद्र मस्केंचे पत्र

0
43
बीड प्रतिनिधी-  राज्यात पोलीस भरती प्रक्रिया चालू असून यामुळे सुशिक्षित बेकारांना संधी प्राप्त झाली आहे. 30 नोव्हेंबर 2022 उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत दिली गेली आहे. भरती प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व स्तरातील उमेदवारांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु वारंवार वेबसाईट बंद पडणे, सर्वर डाऊन होणे या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यात मोठे अडथळे निर्माण झाले असल्याने भरती प्रक्रिया सहभाग घेणारे उमेदवार त्रस्त झाले आहेत. अगदी तीन दिवसात फॉर्म ऑनलाईन भरणे शक्य नसल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.. सर्व इच्छुक उमेदवारांना न्याय आणि संधी देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करून मुदतवाढ देण्यात यावी. अशी विनंती करणारे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवले आहे. राज्यातील भरती इच्छुक उमेदवारांची अडचण लक्षात घेऊन शासन निश्चितपणे मुदतवाढ देईल असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे
राज्यात चालू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी असणारी वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. अजूनही अनेक उमेदवार अर्ज ऑनलाईन करण्यासाठी प्रचंड धडपड करत आहेत. अगदी पहाटे चार वाजता उमेदवारांची गर्दी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. शिवाय ऑनलाइन भरलेली फीस चलन होत नसल्यामुळे भरलेले अर्धे अधिक फॉर्म अद्याप अधिकृत झालेले नाहीत.
ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणीमुळे नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी देखील उमेदवारांचा बराच वेळ जात आहे.
अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक समस्यांचे निवारण करून, भरतीतील उमेदवारांची होत असलेली गैरसोय थांबवावी. सर्व इच्छुक उमेदवारांना पोलीस भरती उमेदवारी अर्ज भरता यावा. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ देण्यात यावी. असे पत्र राजेंद्र मस्के यांनी पाठवले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here