संघटन वाढीसाठी गर्दी पेक्षा दर्दी कार्यकर्तेच कामाला येतात – अँड. अजित देशमुख

0
32

बीड  प्रतिनिधी : कोणत्याही संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे दर्दी असली पाहिजेत. संघटनेतील गर्दी काही कामाची नसते. पुरुषांच्या हक्कासाठी भांडणारी पुरुष हक्क संरक्षण समिती ही गेल्या अनेक वर्षापासून काम करत असल्याचे आपण पाहत आहोत. या संघटनेचे काम देखील समाज हिताचे आणि महत्त्वाचे आहे. समाजाच्या जडण घडणीत कौटुंबिक स्वास्थ्य गरजेचे असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण काम करता, म्हणून आपले काम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले.

पुरुष हक्क संरक्षण समितीच्या मराठवाडा पातळीवरील अधिवेशनाच्या प्रमुख पाहुणे या पदावरून बोलताना ते बोलत होते. समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना ते पुढे म्हणाले की, गेले कित्येक वर्षां पासून पुरुष हक्क संरक्षण समितीचे कामकाज आपण पाहत आहोत. संथ गतीने परंतु चांगल्या पद्धतीने पुरुषांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे संघटन कार्यरत आहे. चांगल्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संघटनेला आपल्या सदिच्छा व्यक्त करत त्यांनी वाद वाढणार नाहीत, यासाठी समाजात प्रबोधन करण्यासाठी संघटनेने सातत्याने पुढे यावं, असं आवाहन देखील केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. अजित देशमुख यांचे सह बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. शहादेव नन्नवरे हे होते. पुरुष हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील घाडगे, सचिव धर्मेंद्र चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष अँड. बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिवेशनाचे संयोजक अँड. नामदेव साबळे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अँड. रामप्रसाद गायकवाड यांचे सह अन्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी विलास भोईटे, सुनील घाडगे, शहादेव ननावरे, धर्मेंद्र चव्हाण, बाळासाहेब पाटील, नामदेव साबळे, रामप्रसाद गायकवाड यांचेसह अनेकांनी आपले मत व्यक्त केले. स. मा. गर्गे वाचनालयात झालेल्या या अधिवेशनाच्या उद्घाटनाला राज्यभरातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here