माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या पाटील यांना मातृशोक

0
35

केज / प्रतिनिधी

बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेशतात्या पाटील यांच्या मातोश्री केजच्या पाटील घराण्यातील विजयमालादेवी देवीदासराव पाटील यांचे रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२-२२ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सुरेश तात्या पाटील, किशोर बप्पा, शालिवाहन अप्पा,सत्येंद्र पाटील यांच्या त्यामातोश्री आहेत.त्या अक्का नावाने सर्व परिचित होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते .आपल्या प्रेमळ स्वभावाने त्या सर्व परिचीत होत्या. नातेवाईकांसह केज व पंचक्रोशीत मोठा परिवार जोडला होता.त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,सुना व नातवंडे -पतरुंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर केज येथील माधवबाग, चिंचपूर मारुती रोड लगतचे निवासस्थान येथे सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ९-०० वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.पाटील परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना केज शहर व तालुक्यातील जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here