Beed : माजलगाव तालुक्यातून  सोयबीनच्या 44 गोन्या लंपास

0
34
शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांवर माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

प्रारंभ वृत्तसेवा

माजलगाव : तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतातील सोयबीनचा 44 गोन्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात शेतीमाल चोरीचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
पठाण शाहेद खाँ आताउल्ला खाँ वय 45 वर्ष (रा.पिंपळगाव पोस्ट गंगामसला ता माजलगाव) यांच्या शेतातील सोयबीनच्या 44 गोन्या, अंदाजे 22 क्विंटल सोयबीन, प्रति क्विंटल 5,500 रुपये असे एकूण 1 लाख, 21 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. शेतकरी यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास माजलगाव ग्रामिण पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here