Beed : परळी तालुक्यातुन दहा टायर ट्रक चोरीस

0
30

संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद

प्रारंभ वृत्तसेवा

परळी : तालुक्यातील टोकवाडी येथील परिसरातून दहा टायर ट्रक अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात वाहनचोरीचे प्रमाण वाढले असून चोऱ्या रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.
सुनिल सोपान निंबाळकर (वय 51 वर्षे) यांनी त्यांची दहा टायर ट्रक (क्रमांक एम.एच.12.एफझेड 9207) टोकवाडी परिसरातील रिलायंस पेट्रोलपंपाच्या पश्‍चिम बाजुस, ग्रामिण इडस्ट्रीज इंन्स्टीटययुट या शाळेच्या समोर लावली होती. येथून अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक चोरुन नेला. निंबाळकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास संभाजी नगर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here