डॉ योगेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने 450 जणांचे घराचे स्वप्न साकारणार

0
32

पिटीआर असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील अनेक लाभार्थ्यांना केवळ तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाचा लाभ घेता येत नव्हता ही बाब निदर्शनास आल्या नंतर युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ज्यांच्याकडे पिटीआर आहे त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा असा आदेश मंजूर करून घेतला
यानंतर डॉ योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तांत्रिक बाबीची पूर्तता करून अर्जदार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी केली त्यानुसार पिटीआर वर नाव नोंदणी असणाऱ्याना घरकुल देण्याचा मार्ग मोकळा झाला असून असे ४०० ते ४५० लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे,डॉ योगेश क्षीरसागर यांच्यामुळे आता या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार आहे

नगर परिषद बीड प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डीपीआर-१०९-९१०-९८९-२०० या चार डीपीआर मधिल जवळपास ४००-४५० मंजुर असलेल्या लाभार्थ्यंकडे जागेचा फक्त पिटीआर होता,मात्र काही तांत्रिक बाबीमुळे या लाभार्थ्यना घरकुलाचा लाभ देता येत नव्हता परंतु गेले २ वर्षा पासुन माजीमंत्री जयदत्त क्षिरसागर,माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षिरसागर आणि युवानेते डॉ योगेश क्षिरसागर हे सातत्याने प्रयत्न करत होते

याबाबत मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान मुख्याधिकारी यांनी सदरिल लाभार्थ्यना लाभ देन्याचे संगीतले त्यामुळे बीड शहरतील पिटीआर वरील सर्व लाभार्थ्यना घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here