गेवराई राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटू लागले

0
45

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत भाजपाचे शेकडो कार्यकर्ते दाखल

गेवराई प्रतिनिधी : दीवाळीच्या धामधूमीत गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटत असून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत ठाकरवाडी, पवारवाडी, गणेशनगर आणि तळणेवाडी अंतर्गत पठाडे वस्ती येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे गेवराई राष्ट्रवादी जोमात असून भाजप -सेना कोमात गेली आहे

दिवाळीच्या धामधूमीत गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ईनकमिंग सुरु झाली आहे. भाजप नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळुन अनेक कार्यकर्ते माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस अमरसिंह पंडित आणि जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  पांचाळेश्वर अंतर्गत ठाकरवाडी,पवारवाडी, गणेशनगर येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते अर्जुन पवार, रमेश पवार, अनिल पवार, गोपाळ पवार, सुरेश पवार, विकास पवार, राजू पवार, विजय पवार, गिन्यानदेव पवार, युवराज राठोड, राजू राठोड, रवी राठोड, सचिन राठोड आदींनी  अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी सरपंच बदाम कपाटे, अंकुश चव्हाण, देविदास राठोड, बंडू राठोड, प्रविण जाधव, विष्णू चव्हाण, राजेंद्र शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

तळणेवाडी अंतर्गत पठाडे वस्ती येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पठाडे यांच्यासह महादेव पठाडे, हरिभाऊ पठाडे, पंडित पठाडे, प्रल्हाद पठाडे, अर्जुन पठाडे, लक्ष्मण पठाडे, नामदेव पठाडे, संतोष पठाडे, सतिष पठाडे, गणेश पठाडे, दत्ता पठाडे, रमेश पठाडे, राहुल पठाडे, विशाल पठाडे, अक्षय पठाडे, किशोर पठाडे, महेश पठाडे, उमेश पठाडे, महेश पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे, सुरज पठाडे, चैतन्य पठाडे, ओमकार पठाडे, शुभम पठाडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर  रामलाल धस, लक्ष्मण ठोंबरे राजाभाऊ धस, दिलीप लबडे, भाऊसाहेब धस, उद्धव भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here