जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी केली गोरगरीबांची दिवाळी गोड ; सर्व धर्म समभावाचा घेतलेला वसा सांभाळला

0
41

केज प्रतिनिधी

जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार यांनी दिवाळी निमिताने केज शहरातील गोरगरीब, कष्टकरी दुर्बल घटकांतील नागरिकांना मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड केली.
पाठीमागील दोन वर्षांपूर्वी कोविड काळात देखील जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून हारुणभाई इनामदार यांनी गोरगरिबांना अन्नधान्य मोठ्या प्रमाणात वाटप केले होते.लहान मोठ्या सणाला गोरगरिबांना हारुणभाई इनामदार यांच्या वतीने सातत्याने मदत करण्यात येत असल्यामुळे शहरातील गोरगरीब नागरिक मोठ्या अपेक्षेने व आशेने त्यांच्या मदतीच्या प्रतिक्षेत असतात.जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी गोर गरिबांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप केली यावेळी गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य निराळे दिसत होते.गोरगरिबांना मिठाई वाटप करताना जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार,केजच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,केजनगरपंचायतचे गटनेते राजू भाई इनामदार, नगरसेवक सुमित बप्पा शिंदे, जफरभाई,महेश जाजू, मोहसीनभाई इनामदार, अमीरभाई इनामदार, एजाजभाई,असिफभाई आणी जनविकास परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोरगरीब जनतेने त्यांना धन्यवाद दिले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here