शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी- शिवसेना केज विधानसभा प्रमुख परशुराम जाधव यांचे आवाहन

0
36

केज/ प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार केज विधानसभा संपर्क प्रमुख मा.परशुराम जाधव साहेब हे केज तालुका दौ-यावर आले असता दिनांक २० ऑक्टोंबर २०२२ रोजी शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या सह मा.परशुराम जाधव साहेब यांनी केज तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची शेतात जाऊन पाहणी केली असता प्रचंड नुकसान झाल्यानें शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी तनावात वैफल्यग्रस्त झाला आहे म्हणून शासनाने शेतकरी बांधवांच्या जीवाशी न खेळता तात्काळ मदत करावी असे आवाहन त्यांनी केले व जर भरीव व तात्काळ मदत शेतकरी बांधवांना मिळाली नाही तर शिवसैनिक प्रशासन व शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असे आवाहन त्यांनी केले यावेळी युवा सेना केज तालुका प्रमुख अरविंद थोरात विधानसभा प्रमुख अशोक जाधव शहर प्रमुख तात्या रोडे उपतालुकाप्रमुख अभिजीत घाटुळ सह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here