जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – माजी मंञी सुरेश नवले

0
42

बीड : राजकीय दृष्ट्या जयदत्त क्षीरसागर सध्या आधांतरी तरंगताना दिसतात. उद्धव सेनेकडून मंत्री व उमेदवारी आपण मिळवलेली होती.सध्या वैचारिक संघर्ष पेटलेला असताना मात्र जयदत्त क्षीरसागर आपण अंग चोरताना दिसता. मूग गिळुन गप्प बसलेले आहात. डोहा काठी डोळे झाकून उभा राहिलेल्या बगळ्यांची भूमिका किती दिवस वठवणार ? असा “मासा” गळाला थोडीच लागणार . नातेवाईकांच्या मदतीने भाजपात जाणार असाल तर जा पण बीड वासियांना कळू द्या.
तळ्यात मळ्यात किती दिवस करणार ? पुन्हा नगरपरिषद ताब्यात घेण्याचा आपला कुटील डाव मुस्लिम मतदारांच्या लक्षात येणार आहे. तेवढा मुस्लिम मतदार चाणाक्ष आणि हुशार आहेच. भुयारी गटार योजनेची गटारगंगा बीड वाशीयांच्या वाट्याला आलेली आहेच. पुन्हा मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घालता कशाला ? जी उद्घाटने स्थानिक आमदारांनी अगोदरच केली आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी किमान मा.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची प्रतिष्ठान तरी पणाला लावू नका. बीड शहराची जी वाट आपण आणि आपल्या बंधूंनी लावलेली आहे तिच्यावर मा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत पांघरूण घालण्याचा प्रयत्न करू नका. संधी साधूपणा सोडा. उघड माथ्याने समोर या आणि आपली भूमिका स्पष्ट करा. उद्धव सेने सोबत की अजून काही हे शिवसैनिकालाही कळू द्या असे आवाहन पञकाद्वारे माजी मंञी सुरेश नवले यांची माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here