स्व.भगिरथ बियाणींच्या स्मरणार्थ दिडशे जणांचे रक्तदान

0
35

बीड : प्रतिनिधी
भाजपाचे बीड शहराध्यक्ष स्व.भगिरथ बियाणी यांच्या स्मरणार्थ रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 159 जणांनी रक्तदान केले.
भाजपाचे बीड शहराध्यक्ष स्व.भगिरथ बियाणी हे त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जिल्हाभरात परिचीत होते. त्यांच्या स्मरणार्थ एमआयडीसी भागातील माँ वैष्णो पॅलेस येथे रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 159 जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. सकल राजस्थानी समाज, सर्व सामाजिक संघटना, मोरया प्रतिष्ठान, स्व.भगिरथ बियाणी मित्रमंडळ, व्यापारी महासंघ, माँ वैष्णो पॅलेस ग्रुपच्या वतीने हे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here