73 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते शुभारंभ

0
39

पं.स.सदस्य परमेश्वर खरात यांचेकडून कार्यक्रमाचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी : बंगालीपिंपळा पंचायत समिती गणातील 73 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. मौजे वडगाव येथे 4 लक्ष रुपये किंमतीच्या पेव्हर ब्लॉक, मौजे सुशी येथे जलजीवन मिशन अंतर्गत 43 लक्ष रुपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना, मौजे सुशी तांडा येथे 6 लक्ष रुपये किंमतीचा सिमेंट रस्ता आणि 20 लक्ष रुपये किंमतीच्या सुशी ग्रामपंचायत भवन बांधकामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पं.स.सदस्य परमेश्वर खरात व ग्रामस्थांनी केले. यावेळी विकास कामे दर्जेदार करण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.

गेवराई पंचायत समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते परमेश्वर खरात यांनी बंगालीपिंपळा गणात विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील विकास कामांना गती मिळाली. पंचायत समितीमध्ये सातत्याने आक्रमक भुमिका त्यांनी घेतली त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. आपल्या भाषणात विजयसिंह पंडित यांनी परमेश्वर खरात यांच्या कामाची प्रशंसा केली. बंगालीपिंपळा पंचायत समिती गणातील मौजे वडगाव व सुशी येथील 73 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.दत्ता महाराज, पं.स.सदस्य जयसिंग जाधव, माजी पं.स.सदस्य हिम्मत खरात, गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप, महिला व बालविकास अधिकारी थोरात, अभियंता चोपडे, सरपंच बबन औटे, विष्णू आडे, विक्रम कदम, चक्रधर मोहिते आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत मौजे सुशी येथील 43 लक्ष रुपये किंमतीची नळ पाणीपुरवषठा योजना, मग्रारोहयो अंतर्गत 20 रुपये किंमतीचे ग्रामपंचायत भवन बांधकाम, 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत मौजे सुशी तांडा येथे 6 लक्ष रुपये किंमतीचा सिमेंट रस्ता तर मौजे वडगाव येथे 4 लक्ष रुपये किंमतीचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प.दत्ता महाराज यांनी आशिर्वाद दिले. कार्यक्रमाला अलिम पठाण, अजित काळे, विनोद पवार, वचिष्ठ काळे, धोंडीराम चव्हाण, उत्तम तुरुकमारे, मुक्ताराम मोंढे, चंद्रकांत पौळ, तिर्थराज पौळ, भारत झरे, सर्जेराव मोंढे, घनशाम फरताडे, बाजीराव तुरुकमारे, नंदु लोंढे यांच्यासह सुशी आणि वडगाव येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here