कायमस्वरूपी योजना राबवण्याचा प्रयत्न – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

0
45
स्व.काकूंची शिकवण आम्ही कृतीतून दाखवून देतो – डॉ. भारतभूषण क्षीरसागर
बीड प्रतिनिधी :  निराधारांना आधार देण्यासाठी समाजातील धनवान लोकांनी थोडीशी मदत गरजू लोकांना केली तर त्यांचे जीवन सार्थकी लागेल, सत्ता असो वा नसो कायमस्वरूपी योजना राबवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे त्याचा अनेक गरजूंना लाभ होतो यातच खरे समाधान आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत बीड शहरात बेघर महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिले महिला शहरी बेघर निवारा केंद्र बीडमध्ये उभारण्यात येत आहे याचा भूमिपूजन सोहळा निवारा गृहातील वृद्ध महिलांच्या हस्ते पार पडला. नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी उभारण्यात येत असलेल्या जिव्हाळा बेघर केंद्राच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर बीडचे मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, दै.पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी सभापती सादेक जमा आणि सर्व माजी नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, माझ्या काळात 4500 निराधारांना संजय गांधी निराधार योजनेद्वारे आधार दिला. मात्र विरोधकांना तीन वर्षात फक्त 113 प्रकरणे निराधारांची मिळाली तीही स्वतः प्रयत्न करणार्‍यांनीच मिळवली. सगळं चमकणारे सोने  नसते. मृगजळाच्या पाठीमागे धावल्यास हाती काहीच लागत नाही. कसोटीवर घासल्यास कळतं कवडी आणि पितळ आहे. अशी अवस्था मागील काळात काही लोकप्रतिनिधींची झाली आहे. आज भूमिपूजन होत असलेल्या इमारतीला दीड कोटीचा निधी मंजूर करून महाराष्ट्रातले एकमेव असे निराधार केंद्र यशस्वी पद्धतीने चालू आहे. दातृत्व करणार्‍या संस्थांना मदत देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. नियतीने ज्यांच्यावर सूड उगवला आहे अशा महिलांना, निराधारांना, वृद्धांना आपली मदत द्या. त्यातून त्यांचे जीवन उभे राहील. शिक्षण, आरोग्य, वीज, अन्न, पाणी, रस्ता या  मूलभूत गरजा आहेत. त्या भागवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बीड शहरातील आणखी नवीन 15 डीपी रस्त्यासाठी 69 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे तर राहिलेल्या रस्त्याचा प्रस्ताव मंजूर होऊन नुकतेच 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्यांच्या बाबतीत आता शहराला चिंता करण्याची गरज राहणार नाही वाढत्या वस्तीनुसार जिथे-जिथे आवश्यकता आहे तेथील रस्तेही आपण करून घेणार आहोत.
याप्रसंगी गजानन बँकेच्या वतीने गुरुकृपा महिला बचत गट आणि महालक्ष्मी महिला बचत गट यांना प्रत्येकी तीन-तीन लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बोलण्यातील ठळक मुद्दे
1) मी बीड मतदार संघात असताना 4500 संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्गी लावली मात्र विरोधकांनी 113 प्रकरणेच मार्गी लावली त्यातीलही बहुतांशी प्रकरणे ही स्वतः लोकांनीच मार्गी लावली आहेत.
2) दुष्काळ थांबवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड साठी प्रयत्न केले. तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना पाठपुरावा करून मराठवाडा वॉटर ग्रीड चा प्रश्न मार्गी लागला, त्यामुळे कोकणातील पाणी समुद्राला वाहून जाते ते पाणी मराठवाड्याला मिळाल्यास समाजाची प्रगती  होईल. हा प्रयोग आंध्रा मध्ये यशस्वी झाला आहे. तोच प्रयोग आपल्याकडेही होऊ शकतो. आजकाल स्वतःला सोने म्हणून चमकाउंन घेणारे अनेक आहेत पण चमकणारे सगळेच चकाकणारे  सोने नसते,
3,) बीड जिल्हा रुग्णालयात 100 खाटाचे हॉस्पिटल पूर्णत्वास जात आहे.
4) 200 खाटांचे हॉस्पिटल थोड्या दिवसात चालू होईल. 5) केंद्र सरकारच्या माध्यमातून नऊ आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. 6) ईट येथे एक मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्यामुळे पाच दिवसाआड नाही तर तीन दिवसाला बीडकरांना पाणी मिळेल.
7)बीड जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पाठपुरावा करून  मेडिकल कॉलेज बीडमध्ये होणार आहे. 8)कोट्यावधी रुपयांचे रस्ते मंजूर करून आणले. 69 कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. त्यातच अलीकडे 20 कोटी रुपयांची ही योजना मंजूर झाली आहे.
यावेळी मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, बेघरांना, निराश्रीत लोकांना एकत्रित करून त्यांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था गेली पाच वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. काकूंनी आम्हाला एक शिकवण दिली आहे, गरिबांसाठी व सामान्यांसाठी कामे केली तर त्यांचे आशिर्वाद पाठीशी राहतात. ही  शिकवण आज पर्यंत आम्ही कृतीतून दाखवली आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना दै. पार्श्वभूमीचे संपादक गंमतभंडारी म्हणाले की, अण्णा जोपर्यंत निवडून येत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी उभा राहील. मला लोक म्हणतात की, गंमतभाऊ ज्यांच्या पाठीशी उभा राहतात तो माणूस निवडून येतो. मात्र मी समाजात फिरणारा सामान्य माणूस असल्याने लोकांचे विचार मला कळतात त्यामुळे मी जयदत्त अण्णांच्या पाठीशी आहे .तुमची ताकद आधीच वाढली आहे .त्यात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक सूचना दिल्या त्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन अण्णासाहेब, अध्यक्ष साहेब आणि सारिकाताई यांनी दिले.
यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की. समाजातील वंचित बेघर माणसाची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. महिला, लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हक्काचे घर झाले आहे. ज्या महिलेला आधार नाही तिच्यासाठी हे हक्काचे घर असून सामाजिक संस्था आणि शासन यांच्या अनुदानातून या ठिकाणी सुविधा मिळत आहेत. निवारा घर आहेच पण तेथील महिलांच्या हाताला कामही मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अन्याय अत्याचार ज्या महिलेवर झाले ती महिला येथे आनंदात आणि सुरक्षित राहू शकते असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी मा.नगरसेवक विष्णू वाघमारे, भीमराव वाघचौरे, विनोद मुळूक, सादेक अली, भैय्या मोरे , भास्कर जाधव, गणेश वाघमारे, बाबुराव दुधाळ, शुभम धूत, मुन्ना इनामदार, राणा चव्हाण, मनोज मस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिला बचत गट, निराधार महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वंजारे यांनी तर सूत्रसंचालन शालिनी परदेशी यानी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here