शोकाकुल वातावरणात शिवसंग्रामची जिल्हा कार्यकारीणी बैठक; ज्योतीताईंनी पक्षाची धुरा हाती घ्यावी!

0
37

समर्थ नेतृत्वाची गरज पाहता ज्योतीताईंनी पक्ष संघटनेची धुरा संभाळावी प्रभाकर कोलंगडे , नारायण काशिद

प्रभाकर कोलंगडे यांच्या प्रस्तावावर जिल्हा कार्यकारीणी बैठकीत एकमत

बीड  प्रतिनिधी – गुरूवार , दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वा . शिवसंग्राम जिल्हा कार्यकारीणीची बैठक संपन्न झाली . बैठकीच्या सुरूवातीला स्व . मा . आ . विनायकरावजी मेटे साहेब यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे हे होते . या बैठकीस शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद , जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे , सुहास पाटील , जिल्हा उपाध्यक्ष किसन कदम , रामदास नाईकवाडे , जिल्हा सरचिटणीस सुनिल आरसुळ , ओबीसी आघाडीचे लक्ष्मण ढवळे , अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पठाण फेरोज खान , सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे , ऊसतोड कामगार नेते बबन माने , गेवराईचे तालुकाध्यक्ष कैलास माने व इतर जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते . सदर बैठकीत खालील ठराव घेण्यात आले . स्व . मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांचा अस्थीकलश संपूर्ण बीड जिल्हयात सर्वसामान्य नागरीकांच्या दर्शनासाठी यात्रा काढण्याचा या वेळी निर्धार करण्यात आला . सदरची अस्थिकलश यात्रा शुक्रवार दि . 19 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हयातील सर्व तालुका , महत्वाची शहरे व गावाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येईल . या यात्रेची सुरूवात शुक्रवार , दि . 19 ऑगस्ट रोजी ठिक 9.00 वा . शिवसंग्राम भवन नगर रोड , बीड येथुन होईल यात्रेचे विर्सजन श्री क्षेत्र पैठण जि . औरंगाबाद या ठिकाणी मंगळवार दि . 23 ऑगस्ट रोजी होईल . सदर यात्रेमध्ये अस्थिकलेशाचे चार रथ सामील होतील तसेच श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी पक्ष नेतृत्वाची धुरा सांभाळणे या बाबत बैठकीत विचार विनिमय करण्यात आला .

स्व . मा . आ . विनायकरावजी मेटे साहेब यांच्या निधनाने संपूर्ण शिवसंग्राम व भारतीय संग्राम परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये शोककळा पसरलेली आहे . सर्वांना याचे अतोनात दु : ख झाले आहे . परंतु या दु : खातुन सावरण्यासाठी व स्व . मा . आ . विनायकरावजी मेटे साहेबांनी घेतलेला वसा व वारसा समर्थपणे चालवण्यासाठी तसेच स्व . मा . आ . विनायकरावजी मेटे साहेबांनी ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष केला असे प्रश्न अजुनही प्रलंबीत आहेत . या पैकी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील भव्य स्मारक निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते या बाबींची पूर्तता करण्यासाठी संघटनेला व पक्षाला समर्थ नेतृत्वाची गरज असल्यामुळे श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या नेतृत्वाची धुरा स्वत : च्या खांदयावर घेवुन संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे नेतृत्व करावे संघटनेला वळ प्राप्त होण्यासाठी हे पाऊल उचलने आवश्यक आहे . असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला .

श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायकराव मेटे यांना मा . राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्व देणे बाबत बैठकीत मागणी झाली . या बैठकी दरम्याण उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व . मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब व त्यांची पक्ष संघटना गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणुन समर्थपणे वाटचाल करत आहे व वेळोवेळी भारतीय जनात पक्षाला अनेक मार्गाने बळ देण्याचे काम करत आहे . मा . राज्यपाल महोदय नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागा नियुक्त करण्यात येणार आहेत . या जागेवरती स्व . मा.आ. विनायकरावजी मेटे साहेबांना नियुक्ती देण्याचा शब्द भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री मा . ना . देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा देलेला आहे . व तो त्यांनी पाळलाही असता परंतु दुर्दैवाने विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन इ वाल्यामुळे आता तसे होवु शकत नाही तरी विनायकराव मेटे यांची जागा त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती डॉ . ज्योतीताई विनायकराव मेटे यांना देण्यात यावी त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी . व स्व . मा . आ . विनायकरावजी मेटे साहेबांनी केलेल्या कामांची पावती म्हणुन सदरील नियुक्ती देण्यात आल्यास शिवसंग्रामच्या लाखो पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना जनमानसात तयार होईल असे मत ही प्रभाकर कोलंगडे , नारायण काशिद व शिवसंग्रामचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केले . या बैठकीस योगेश शेळके , विनोद कवडे , मनोज जाधव , किसन कदम , अॅड . राहुल मस्के , कैलास शेजाळ, सुनिल आरसुळ , राजेंद्र आमटे , अॅड . मनिषा कुपकर , पठाण फेरोज खान , सुनिल शिंदे , अक्षय माने , दशरथ मोरे , बबन माने , पंडित शेंडगे , शिवराम शिरगिरे हे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here