मंत्रिमंडळ विस्तारात बीड जिल्ह्याला निराशा!

0
46
शिंदे सरकारच्या 18 मंत्र्यांनी घेतली शपथ
परत पंकजा मुंडे यांना डावलले; आ.मेटेंच्या पदरी निराशाच

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : तब्बल एक महिन्यानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (ता. 09) राजभवन येथे पार पडला. शिंदे गटाचे 9 व भाजपाच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतू या मंत्रीमंडळ विस्तारात बीड जिल्ह्याला मात्र निराशाच मिळाली. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना परत डावलल्यात आले. तसेच शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. विनायक मेटे यांना सुद्धा निराशाच मिळाली. बीड जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाल्या नसल्यामुळे दुसऱ्या यादीत तरी बीडला दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज मुंबईतील राजभवन येथे पार पडला. यात शिंदे गटाच्या नऊ व भाजपाचे नऊ आमदार असे एकूण 18 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. औरंगाबाद जिल्ह्याला यात तीन मंत्रीपद मिळाले असले तरी बीड जिल्ह्याला मात्र या निराशा मिळाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना परत डावलण्यात आले आहे. वारंवार पंकजा मुंडे यांना सत्तेतुन दुर केले आहे. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजगी निर्माण झाली आहे. यासह सरकारचे मित्र पक्ष म्हणून शिवसंग्राम शिंदे सरकार सोबत आहे. यावेळेस तरी माजी आ. विनायक मेटे यांना संधी मिळेल अशी आशा होती. परंतु परत त्यांच्याही पदरात निराशाच पडली आहे. दुसऱ्या यादी तरी बीड जिल्ह्याला मंत्री पद मिळेल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here