शिंदे शिवसेना व भाजपा  एकत्रित पणे निवडणूका लढवणार – राजेंद्र मस्के

0
35

राज्यात परिवर्तन घडलं, बीड मध्ये परिवर्तन घडणार….!

बीड प्रतिनिधी : राज्यात 2019 मध्ये मतदार बांधवांनी भाजपा शिवसेना युतीला कौला दिला होता. दुर्दैवाने शिवसेना – राष्ट्रवादी- काँग्रेस यांची अनैसर्गिक युती होऊन मविआ सरकार अस्तित्वात आले. जनतेच्या विरोधातील या सरकारने जनतेच्या मताविरुद्ध कारभार करून, महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र थांबवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेऊन सत्ता भोगली. अखेर शिवसेनेचे कट्टर हिंदुत्ववादी नेते एकनाथजी शिंदे आणि 40 आमदारांनी हि अनैसर्गिक युतीला छेद देऊन, सरकारच्या बाहेर पडले. म्हणून आज राज्यात पुन्हा एकदा भाजपा शिवसेनेचे सरकार स्थापन झाले.

याच धर्तीवर बीड मध्ये सुद्धा परिवर्तन घडणार आहे. आगामी  काळातील निवडणुका हिंदुत्वादी शिंदे शिवसेना – भाजपा – रिपाई  एकत्रित पणे व ताकतीनिशी लढवणार असल्याचे सुतोवाच भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीड येथे केले.

आज संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे शिवसेनेचे नुतन जिल्हाध्यक्ष श्री कुंडलिक खांडे आणि श्री सचीन भैय्या मुळुक यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के , सर्जेराव तात्या तांदळे,  नवनाथ शिराळे,सलिम जहांगीर, प्रा.नागरगोजे देविदास,  चंद्रकांत फड,भगीरथ बियाणी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 या प्रसंगी प्रमोद रामदासी,शरद बडगे, योगीराज भागवत, सरपंच वसंत गुंदेकर, सरपंच रामा बांड, सरपंच बाबुराव कदम, योगीराज भागवत, ऋषिकेश फुंदे,पंकज धांडे, अनिल शेळके, महेश सावंत, सुग्रीव डोके, देवा दहीवाळ,  बद्रीनाथ जटाळ, येवले आदीसह भाजप – सेना  कार्यकर्ते  उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी विचार प्रकट करताना  राजेंद्र मस्के यांच्या विचारला  दुजोरा दिला. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून  जिल्ह्यात शिवसेना – भाजपाचे निकोप व जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक राजकीय लढाया एकत्रित पणे लढवून विरोधकांवर यशस्वी मात केली. यापुढेही शिवसेना – भाजपमध्ये सलोख्याचे संबध राखून आगामी काळातील निवडणुकात यश खेचून आणले जाईल. असा विश्वास दोघांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here