मी हिंदुस्थानी, देशप्रेमानी ओतप्रोत भरलेले नाटक – प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर

0
35
बीड  प्रतिनिधी :  मी हिंदुस्थानी हे नाटक देशप्रेमाने, देशभक्तीने, देशाभिमानाने ओतप्रोत भरलेले नाटक आहे. भारतीय संस्कृती, चाली रिती, रूढी परंपरा, भारतीय निसर्ग, भारतातील पर्याटन क्षेत्राशी अचुक आणि थेट संवाद साधणारे, मोठ्यांचा आदर आणि सभ्यता शिकवणारे नाटक म्हणजे मी हिंदुस्थानी अशी प्रशंसा बीड नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड नाट्य परिषद आणि सौ.के.एस.के.महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने पसायदान अकादमी अहमदनगर निर्मित मी हिंदुस्थानी या नाटकाचा प्रयोग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने करण्यात आला. पी.डी.कुलकर्णी लिखीत, दिग्दर्शीत मी हिन्दुस्थानी या नाटकाचे सौ.के.एस.के.महाविद्यालयाच्या सभागृहात सादरीकरण करण्यात आले. 35 दिवसात 75 प्रयोग विनामुल्य करण्याचा पसायदान अकादमीचा संकल्प आहे. त्याचाच भाग म्हणून दिनांक 4 ऑगस्ट रोजी सैनिकी स्कूल, कानडीघाट शाळा व महाविद्यालयात असे तीन प्रयोग करण्यात आले. दोन पात्री या नाटकात भारतीय संस्कृती, भाषा, शिक्षणपध्दती, जाती, वर्ण, धर्म, मानवता निसर्ग, स्त्री सन्मान, उच्च-निच्चता, समानता, साहित्य लेखन, विविधता अशा अनेक विषयांना स्पर्श करून जाते. परदेशी शिक्षण आणि भारतीय संस्कृती या बद्दल अतिशय मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. पी.डी.कुलकर्णी आणि कोमल पाटील यांनी यात अभिनय केला असून शैलेश देशमुख यांनी तांत्रीक बाजू सांभाळल्या.
अतिशय उस्त्फूर्त प्रतिसाद या नाटकाला मिळाला असून पुढील प्रयोगासाठी प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीश माऊलगे, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर, क.म.वि. उपप्राचार्य सय्यद एल.एन., पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ.दुष्यंता रामटेके यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी, नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here