धनदांडग्यांच्या हिताच्या भाजपा सरकारला सर्व सामान्य जनता माफ करणार नाही – गणेश बजगुडे पाटील

0
30

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

बीड / बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना यासह जीवनावश्यक वस्तूंवरील लादलेल्या अवाढव्य जी एस टी विरोधात आंदोलन करण्यात आले. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत महागाई व जी एस टी ला प्रचंड विरोध करत देशातील मोदी सरकारवर घणाघात केला आहे. याचे पडसाद आज बीड मध्ये दिसून आली. आंदोलना दरम्यान बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे. मन की बात सुनावत देशातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्यावर हुकूमशाही प्रमाणे अन्याय करणारे हे सरकार जीवनावश्यक वस्तूंवर जर जी एस टी लादत असेल तर यापेक्षा दुर्दैव कुठले नाही. ज्या गोरगरिबांना आच्छे दिनाचे स्वप्न दाखवत हे सरकार सत्तेत आले. तेच जर आज आश्यास्वरुपाचे अन्याय करत असतील तर न्याय कोण देणार आसही प्रश्न आता जनतेला पडलेला आहे. म्हणून गोरगरिबांच्या हक्कासाठी आता काँग्रेस देशभरात रस्त्यावर उतरलेली आपण पाहत आहोत. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना इ डी च्या कारवाई मध्ये विनाकारण गुंतवण्याची प्रकिया सुरू केली परंतु गांधी परिवार व काँग्रेस हे त्यागातून आलेले आहे व देशातील जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. हे आता लक्षात घ्यायला हवे. एकीकडे देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना अग्निपथ योजनेच्या नावाखाली दिशाहीन केले जात आहे. त्यांच्या भावनांशी खेळ चालू आहे. दुसरीकडे कोणाच्या हाताला काम नोकरी नाही, महागाईमुळे जनता प्रचंड त्रस्त असताना जीवनावश्यक वस्तूंवर पुन्हा जी एस टी लादली जाते म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शाहाचे हे सरकार धन दांडग्यांच्या व उदोजगाकच्या हिताचे असुन गोरगरीब कष्टकरी शेतकरी समाज यांना कधी ही माफ करणार नाही. मोदी सरकारच्या या तनाशही विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरली असून काँग्रेस नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचेच राजकारण करत आलेला देशातील एकमेव पक्ष आहे. महाराष्ट्रात नानाभाऊ पटोले, खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वात देखील आम्ही सर्व गोरगरिबांच्या हक्कासाठी कायम लढा उभारू असे गणेश बजगुडे पाटील म्हणाले, यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव फरीद देशमुख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ थोटे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, शहराध्यक्ष परवेज कुरेशी, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल टेकाळे, रोजगार सेलचे प्रदेश सरचिटणीस गणेश जवकर, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष अविनाश डरपे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, एस सी सेल जिल्हाध्यक्ष गोविंद साठे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सफदर देशमुख, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख बबलु भाई, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष खमर शेख, कृष्णा साळुंके, आमेर शेख, अमजद कुरेशी, शेख जमीर, सय्यद नसीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here